दुवा उघडून वाचला.त्यात लिहिल्याप्रमाणे जर आसामात किंवा हल्लीच्या बिहारमध्ये भीष्मकाचा विदर्भ असेल तर बोलणेच खुंटले. रुक्मिणीहरण लिहिणारा शंकरदेव हा आसामी कवी १५ व्या शतकातला. त्याचे म्हणणे खरे धरायचे की, तेराव्या शतकात रुक्मिणीस्वयंवर लिहिणारा महानुभावी(मराठी) लेखक नरेंद्रपंडित हा खरा? नरेद्रपंडिताने लिहिल्याप्रमाणे विदर्भाच्या ईशान्येला कैलास आहे, जरा अलीकडे शोणितपूर. आणखी पूर्वेला गंगेच्या मुखाजवळ सागरसंगम राज्य, तिथेच वंगदेश, जवळच कौशिकी(बिहार)च्या काठावर कोश नावाचे राज्य, त्यापुढे महारथी कर्णाचा अंगदेश. व जवळच मगध आणि मणिपूर वगैरे.
नरेन्द्रपंडिताच्या ग्रंथातील किन्नराने विदर्भाच्या बाजूच्या आठही दिशांची राज्ये आणि तेथील राजे यांचे वर्णन रुक्मिणीला ऐकवले आहे; ते वाचले की विदर्भाचे भौगोलिक स्थान मराठवाड्यालगत असले पाहिजे असे अनुमान निघते. अर्थात आसामींना रुक्मिणी त्यांची वाटत असेल तर आपण त्यांच्या श्रद्धेला का धक्का पोहोचू द्यावा? काही झाले तरी, रुक्मिणी ही श्रीकृष्णाची आवडती बायको!