तुमचं वय हे या घटनेला पुरेसं कारणीभूत आहे. त्याचवेळी तिचं वयही तुमच्या मनाची घालमेल होण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे.
नजरोत्पन्न भावनेला आकर्षणापलिकडे विचारात घेऊ नये. अशी कोणतीही घटना, संवाद अथवा सहवास तुमच्यामध्ये घडलेलाच नाही, ज्यामुळे आपण या भावनेला 'प्रेम' संबोधावे.
मनाची ही अशी एक अवस्था होती, जिचा आपण आयुष्यभर आनंद घ्यावा... फक्त आठवणींनी!
"मला कधी तरी अशी भावना जाणवली होती" या विचाराने उद्या खुदकन स्वतः शीच हसावे आणि या गोष्टीचा विचार सोडून द्यावा;. 'जीत' अथवा 'हार' म्हणण्याइतकं महत्त्व देऊ नये.
अभिनंदन!!!