संवाद विशिष्ट पर्यावरणात होत असतो. त्या पर्यावरणानुसार भाषा आकार घेईल. नेहमी पर्यावरण नाही. पर्यावरणानुसार भाषा आकार घेईल असे निदान प्रतिभावान लेखकांनी तरी म्हणू नये असे वाटते. सर्वसामान्य माणसाने तसे म्हटले तर ठीक आहे.
इथे पर्यावरणाचा काय संबंध? पर्यावरण म्हणजे अवस्था(हालत) नाही, स्थिति-परिस्थिती नाही, परिसर नाही, प्रसंग नाही, प्राप्त दशा नाही, हवामान नाही आणि वातावरणही नाही; पर्यावरण म्हणजे हवेतल्या भौतिक आणि रासायनिक घटकांमुळे निर्माण झालेली वातावरणाची स्थिती. हे घटक जर वनस्पती किंवा प्राणिजीवनासाठी अपायकारक असतील तर आपण त्याला प्रदूषण म्हणतो.
भाषा, संवाद आणि लेखन यांचा पर्यावरणाशी जवळचा संबंध नाही.