रस्त्यालगत घडणारी ही कथा परिणामकारक झाली आहे. आगगाडी व गावकीच्या गाण्यांचा वापर विशेष. लहानपणी कोळश्याचे इंजिन बघायला आम्ही  शिट्टी ऐकू आली की घराबाहेर धावत असू त्याची आठवण आलीव व पॉथेर पांचालीचीही.

एकंदर विसुनानांशी सहमत आहे. पण कथा कुठे भडक होत नाही हे संवेदनशीलतापेक्षाही प्रगल्भतेचे लक्षण असावे. काही ठिकाणी भाषा किंचित तकतकीत, सुखी वाटते. जसे "लगेच दोघींनी आपापसांत ते समसमान वाटून घेतले. काय छान लागले खायला!" इथे निम्मे चालून गेला
पायी चालणाऱ्यांकडे पूर्वीसारखाच तुच्छ कटाक्ष टाकत राष्ट्रीय महामार्ग आता दुप्पट आवाजात रोरावत होता...!! 

इथे "पायी चालणाऱ्यांकडे" हवेच का, असे वाटून गेले.



पॉथेर पांचालीतला आगगाडीचा प्रसिद्ध सीन
(इथे किंवा चित्रावर टिचकी मारून बघता येईल.)