एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
एका पत्राची गोष्ट
रोज सकाळी पोस्टमन येतो, पण येतात ती बिल- टेलिफोन,वीज, पाणी यांची बिल, जाहिरातींनी भरलेले पेपर आणि मासिके.
हस्तलिखित पत्राला मी जिवंत पत्र म्हणते. त्या पत्रातून व्यक्तीचे स्पंदन, मायेचा स्पर्श, भावभावना माझ्यापर्यत पोहोचते. असे जिवंत पत्र जेव्हा केव्हा येते तो दिवस अगदी भारल्यासारखा जातो. साधारणपणे असे पत्र येते तेव्हा त्याबरोबर दिवाळीचे भेटकार्ड, कुणाची लग्नपत्रिका किंवा ख्रिसमसचे कार्ड असते. पत्र येईपर्यंत कधी फोटो गायब होतात, आतली चिठ्ठी नसते तर कधी नुसतेच वरचे पाकीट येते ..तेही फाटलेले...असेही झाले आहे. ...
पुढे वाचा. : एका पत्राची गोष्ट