सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदू..,
क्षितिजावरले माझ्या धृवही सरकले! >>>>>

जयंतदा धन्यवाद ! वरील दोन ओळीत कवी पुन्हा स्वतःच्या नशिबाची तक्रार करतोय. क्षणभंगुरतेचा शाप असलेले दंवबिंदुदेखिल तिच्यासाठी सावरून बसण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्याबाबतीत मात्र अढळ मानले जाणारे धृवही स्थिर राहत नाहीत, एवढा का मी कमनशिबी आहे?