वा वा वा मानस
बऱ्याच दिवसंनी एक साधी सोपी पण खूप सुंदर गझल वाचायला मिळाली धन्यवाद.
वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली
भिंत सारे बांधती, मी पवनचक्की बांधली!
मतल्यातला वेगळा दृष्टिकोण भावला.
जीवनाच्या चाचणीला निवडताना उत्तरे,
पेन्सिली झिजल्या जरा, पण खोडरबरे संपली!चालतो मी पावसातून एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी आसवे जी वाहली!
ह्या दोन्ही द्विपदी आवडल्या.
शेवटची द्विपदी वाचताना मला ही भीतीने कापरे भरले !