मुंबई भले कितिही भारी असो, आर्थिक राजधानी वगैरे असो पण, ती महाराष्ट्राची आहे हे सत्य आहे.. मग ते म्हणायला गोची कशाबद्दल?
सचिन भारी नव्हे देव आहे... मी तरी मानतो, परंतु त्याला हा प्रश्नाचा बाउंसर खेळता आला नाही तर सपशेल त्रिफळा उडाला आहे... त्याने "मी मैदानावर असताना मी फक्त एक खेळाडू असतो.. जो भारतासाठी खेळतो" एवढेच म्हणले असते तरी चालले असते. "मुंबई" विषयीच्या प्रश्नावर हसून केवळ विनोदव्रुत्तीने - "तुम्हाला माहित नाही ?- जाउदे आपण सध्या खेळाबद्दल बोलु," असे म्हणावे ना ?
पण, चैंपियन ची पण मती भ्रष्ट झाली त्या क्षणी, आणि आता, बुंद से गयी वो... झाले...
काय करणार.. मराठी माणुसच मराठी म्हणून घ्यायला, मराठीचे नाव घ्यायला, न मराठीच्या गावला माझा गाव म्हणताना विचार करतो..मग अजून काय होणार ?
आपल्याला शाप आहे हेच खरं