शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
चौक १
छत्रपती शिवाजी रणशूर । घेऊनि तलवार ।
मोंगल जर्जर । करुनि राखिला हिंदुधर्मास ॥
स्थापियली स्वतंत्रता देशास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥जी॥
भोजराजा माहित सकलांस । रजपूत वंश । त्याचा जो अंश ।
वाढला म्हणती भोंसला त्यास ॥ त्याच कुळिं शहाजी आला जन्मास ।
पराक्रमी महान् वचक यवनांस ॥ धन्य वीर शहाजी भोंसला ।
पिता शोभला । शिवाजी राजाला । जिजाबाई माता जन्म देई ॥
शिवनेरी किल्याच्या ठायीं । किल्ला हा पुण्यानजिक हाई ॥
शके १५५१ स । फाल्गुन महिन्यास । वद्य तृतीयेस ।
शिवाजी रुपें शंकर अवतरला ॥ सुटला थरकांप दुश्मानांला ।घडा ...
पुढे वाचा. : छत्रपती शिवाजी महाराज (पोवाडा) - शाहीर महादेव नानिवडेकर