शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:

शपथ घेतली जिवराजानं राज्य हिंदवी करण्याची ।
जिवाभावाचे मित्र जमविले केली तयारी युद्धाची ॥
कंक येसाजी बाजी फसलकर जिवाजी शूर हि माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी वीर हिरोजी पिलाजी नेता तानाजी ॥
कैक असे हे मित्र जमविले झाली तयारी लढण्याची ॥जी॥
चाल
तोरणा गड जिंकून आरंभ केला ॥
स्वराज्याचे तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला ॥
असा व्याप वाढतच गेला । पण पैसा कुठून आणायचा कार्याला ।
तेव्हां शत्रूची लूट करण्याचा बेत तो केला ॥
कल्याणचा खजिना चालला होता विजापूरला ।
तो खजिना आला बोरघाटाला । मावळ्यांनीं लुटून फस्त ...
पुढे वाचा. : कल्याणचा खजिना लूट (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर