शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
शिवछत्रपतींची कीर्ती । गाऊ दिनरात्री ।
येईल मग स्फूर्ति । जाई भयभीति पार विलयाला ।
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा इमला बांधून धन्य तो झाला ।
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥ध्रु०॥
असंख्य तारे तेजबलानें शोभविती आकाशाला ।
परि शुक्राचा तारा एकच खेचुनि घेतो डोळ्याला ॥
दाहकता सूर्याची भरली शिवरायाच्या मूर्तीत ।
तशि मोहकता चंद्राची ती भरुनि राहिली देहांत ॥
वटवृक्षाची विशालता ती कडुलिंबाची कडवटता ।
आम्रफळाची रसाळता ती बाभळिची ही कंटकता ॥
अथांग गंभिरता दरियाची सरोवरची गोडी ती ।
हिमालयाची असे भव्यता ...
पुढे वाचा. : छत्रपतींचा पोवाडा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर