चिमणचे चर्हाट येथे हे वाचायला मिळाले:
"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला ...