वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

वर्ग, घन इ. आकडेमोड करून काढता येतात; पण वर्गमूळ, घनमूळ इ. काढायला कॅल्क्युलेटरची जास्त गरज लागते असे आठवते.   

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खऱ्या, पण घोडनवरी चालली!

येथे चप्पला ऐवजी खेटरे केले तर ओळ जास्त चांगली होईल असे वाटते.

खेटरे झिजली खरी, पण घोडनवरी चालली.