आपण इंग्रजांचे इंग्रजी भारतात बोललो तर, किती लोकांना समजेल?  तेव्हा मूळ प्रमाण इंग्रजी शिकाच, पण इतरांना कळावे असे वाटत असेल तर त्यांना समजेल असे शब्द वापरा आणि तसेच उच्चार करा.  अमेरिकेत जायची वेळ आली तर खास अमेरिकन शब्द आणि त्यांचे विशिष्ट उच्चार यांचा जरूर अभ्यास करा. अशा शब्दांचे कोश आंतरजालावर आहेत आणि विकतही मिळतात. लिहिलेले शुद्ध इंग्रजी मात्र बहुतेकांना कळते.
मराठीच्या बाबतीत अगदी असेच आहे.