पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसनेच्या श्रद्धा जाधव निवडून आल्या म्हणून शिवसेनेत जल्लोष केला जात आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्य़क्ष तर थेट सहकुटुंब महापालिका मुख्यालयात आले. नुसत येऊन थांबले नाहीत तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी चक्क बोलले. हा निष्ठावान शिवसैनिक व नगरसेवकांचा विजय असून शिवसेना आणि मुंबईवरील प्रेमाला तडा गेलेला नसल्याचे यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रियाही ठाकरे यांनी दिली. विजय हा विजय असतो, असेही त्यांनी सांगितले. अगदी मान्य. पण हे यश खरोखरच निर्भेळ आहे का, याचा मनाशी प्रामाणिकपणे विचार करा. असे कळेल की या ...