माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:
'संपतोय की नाही' असे वाटणार्या त्या दिवसाचा अखेर काळ पहाटे ४ वाजता अंत झाला होता. त्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या मला झोप लागली. पण तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... माझ्या अवघ्या मीटरभर बाजूला एसीच्या पॉवरसप्लायमधून प्रचंड धूर निघत होता. संपूर्ण खोली धुराने भरली होती. काही क्षणात तो आता पेट घेईल अशी वेळ आली होती. मी पटकन शमिकाला उठवले आणि सर्व सामानघेउन खोली बाहेर पडलो. सकाळी लगेच निघायचे असल्याने सर्व सामान बॅगेतच होते. बाजूच्या खोली मधून अमेय आणि कुलदीपला उठवून शमिकाबरोबर थांबायला ...