मी फक्त एकदाच सर्कशीला गेले होते.. फार लहान असताना आणि त्यावेळी हिंदीत सुचना एकून मला काही कळलेच नाही की काय बोलत आहेत कारण मला हिंदी कळायचे नाही इतकी छोटी होते मी.. त्यामुळे मी फारशी एंजॉय केली नव्हती कारण एकतर फारच गर्दी होती आणि त्यामुळे मला मागून स्टेज वरचे काही नीट दिसलेही नव्हते.. शिवाय सर्कस म्हटले की मला मराठीतला एक धडा आठवतो ज्यात लेखकाला सर्कशीत काम करत असताना अचानक दिवे जातात आणि प्रेक्षकातील कोणीतरी एक काडेपेटी पेटवून प्रकाश देण्याचा प्रयत्न करतं आणि मग अचानक अनेक लोकं काड्या पेटवून त्याला प्रकाश दाखवतात असंच काहीतरी