जागतिक पातळीवर निव्वळ समकालीन जनाधाराचा विचार केला, तर असं लक्षात येईल की, अमेरिकन सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका आणि संगीत यांद्वारे जगभर पोचणारं अमेरिकन इंग्रजी जास्त लोकांना समजतं. त्यामुळे निव्वळ व्यवहारापुरतं जर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं असेल, तर अमेरिकन इंग्रजीला पर्याय नाही.
(ही माझी व्यक्तिगत रुची नाही. व्यक्तिशः मला ब्रिटिश इंग्रजीच आवडते. पण तो माझा साँदर्यशास्त्रीय विचार झाला; व्यावहारिक नव्हे.)