अर्थात उत्तर बरोबर आहे ते वेगळे सांगायला नकोच. त्याबद्दल अभिनंदन आणि सहभागाबद्दल आभार.

मी नेहमी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असतो. नेहमी तुमच्या सूचना पुढील वाटचालीला मदत करतात.


टवाळराव, हा स्वैर अनुवाद आहे की भाषांतर हे स्पष्ट नाही. स्वैर अनुवाद असल्यास  माझे खाली नमूद केलेले आक्षेप गैरलागू आहेत व त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. मात्र भाषांतर असल्यास त्यावर अधिक विचार करायला हवा होता असे वाटते

हे भाषांतर शक्य तितके मूळ गाण्याशी अर्थाला तंतोतंत करण्याचाच माझा प्रयत्न असतो. (अगदी क्वचित मी मूळ कल्पना बदल्तो ) त्यामुळे भाषांतरावरची टीका मी मार्गदर्शन मह्णूनच घेतो.

आता तुमचे एकेक मुद्दे

'आम्ही प्रेमाच्या वाटेवरील मस्त प्रवासी आहोत, प्रेमाचा रस्ता जिथे नेईल तिथे आम्ही जाऊ, हरवून जाऊ, मंजिल/ध्येय कुठे आहे हे आम्हांस ठाऊकही नाही' असा अर्थ दिसतो, जो .... प्रेमपथावर हरवून जाण्याची सुप्त इच्छा आहे. अनुवादातील "जर" मुळे अर्थहानी होत आहे.

काही प्रमाणात अमान्य. मला जे भाषांतर आंतरजाला वर मिळाले त्यानुसार मूळ गाण्यात जर-तर असा अर्थ आहे असे वाटते.

... म्हणजे उत्साह, चेव, हर्षोत्साह. संजीवन नाही

मान्य. अर्थ माहीत आहे(म्हणजे मी शब्दकोशात पाहिला आहे  ). मी उत्साह -> चेव -> चैतन्य -> संजीवन असा अर्थ घेतला. तेथे गागागा असा शब्द हवा होता.

...तरी काय करू? ही प्रेमाची नगरी माझ्यासाठीही अपरिचित आहे, नवी आहे.

माझा मुद्दा वरीलप्रमाणेच. मला मिळालेल्या प्रतीत नगरी साठी शब्द नसून दृष्टीसाठी शब्द होता. त्यानुसर मी पुढे गेलो.

...माझ्या हृदयात सामावला'. इथे 'तोच' माझ्या हृदयात सामावला, दुसरा कोणी नाही' असा भाव नाही. तेव्हा 'ज्याच्यावर' ऐवजी 'त्याच्यावर' वापरले तर अर्थछटेस न्याय मिळेल.

तुम्चा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. मात्र मूळ गाण्यात 'तो' हा उल्लेख वाचोन केवळ नायकनायिका एकमेकांविषयीच बोलत आहेत असे मला वाटले. शेवटच्या ओळीतही श्वासात आग आणि कंठात गीत ही आपापसातलीच भावना आहे असे वाटले.

तुमचे प्रतिसाद खरोखरच फार मनापासून लिहिलेले असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशा प्रतिसादांमुळेच नवे नवे काही करायला उत्साह राहतो.

(शेवटी उत्तर सांगेन तेव्हा मला मिळालेली प्रत ही कोठे आहे ते सांगेन त्यावरून  मला काय वाटले ते स्पष्ट होईल. )

पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.