अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:
जेव्हा माझ लेहला बाईकने जायचं निशित झाले, त्याच वेळी माझ्या डोक्यात विचार आला कि माझी बाईक (TVS Victor) हि जुनी झाली आहे, ६ वर्ष आणि ७५००० किलोमीटर चालली आहे. वास्तविक ती मुंबईत चालवायला ठीक होती, कारण मी तिचे shock absorber, battery, सगळे बेर्रिंग, टायर आणि बरेचसे पार्टस नवीन घातले होते. पण ती लेह सारख्या मोठ्या ट्रीप साठी पात्र वाटत नव्हती. म्हणून मी हिला विकायचे ठरवले. मला माझी विक्टर विकायची जरापन इच्छा नव्हती, कारण माझा बर्याच आठवणी या बाईक बरोबर होत्या. पण दोन दोन बाईक मला पोसता नसत्या आल्या म्हणून मी माझ्या मेकॅनिकला आणि बर्याच ...