पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
सचिन तेंडुलकर. तमाम मराठी माणसांसाठी असलेले अभिमानाचे आणि गौरवाचे नाव. सचिनने मोठ्या मेहनतीने आज स्वताचे आणि महाराष्ट्राचेही नाव मोठे केले आहे. सचिन नावाभोवतीच एक वलय निर्माण झाले आहे. सचिन हे एक चलनी नाणे झाले असून गोष्टीतील मिडास राजाप्रमाणे सचिन तेंडुलकर ही मुद्रा ज्या ज्या वस्तू किंवा उत्पादन कंपनीवर उमटली की सोन्यापेक्षाही जास्त किंमत आणि महत्व त्याला प्राप्त होते. आजच बहुतेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सचिनबाबतच्या बातम्या ...