प्रवासी,तुमची विनोदी शैली आवडली. रात्री जागरणे तब्येतीला घातक असतात आणि वाढत्या वयानुसार त्याचा अधिक त्रास जाणवतो असे म्हणतात.
जाग आल्यावरही पांघरुणात गुरफटून पडण्यातले सौख्य काही निराळेच, आई म्हणून अंगावर उड्या मारणारे मूल शेजारी असले की ह्या सुखाला पारखे झालो याचा खेद वाटत नाही..त्या चिमण्या बोलांनी, प्रेमळ नजरेने, इवल्या बोटांनी जे सुंदर स्वागत होते त्याला तोड नाही. आईला उठायला उशीर झाला तर बाळाचा राग ओढवून नाक,कान याना थोडीफ़ार इजा सुध्दा होते असो,(आजकाल मुले बाबांना पण सोडत नाही तेव्हा बाबा ह्या झोपेच्या सोंगाच्या सुखाला नक्की पारखे होतात) पण एखादा फ़ोन, दारावरची घंटा, राहिलेल्या कामाची आठवण यामुळे जर पांखरूणातून अकाली(?) बाहेर यावे लागले तर माझा नुसता राग राग होतो.
आजकाल मी मनोगतावर विश्रांती घेते. टुकार, बळेच हसू आणायला लावणारी विडंबने, त्यात मुद्दाम वापरलेली, वाचून किळस वाटावी अशी भाषा, ट ला ट लावून केलेल्या कविता, काहीही साध्य होत नाही अशा काही चर्चा, भरीला भर म्हणजे माझ्यासारख्यांचे रटाळ लेखन ह्यामुळे कार्यालयात डोळा लागण्याची शक्यता खूप वाढीस लागली आहे. कुठली उशी, कुठली गादी आणि दुलाई!जाऊ द्या. नोकरदार स्त्रीयांची ही एक समस्याच आहे!