भोमेकाका,
तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मला शाळेत असताना वाचलेल्या कवितेचे शब्द आठवले -
"नॉट अ ड्रम वॉज हर्ड, नॉट अ फ़्यूनरल नोट
ऍज हिज कॉर्प्स टू द रॅम्पार्ट वी हरीड
नॉट अ सोल्जर डिस्चार्ड हिज फ़ेअरवेल शॉट
ओव्हर द ग्रेव्ह व्हेअर अवर हिरो वी बरीड"
सूर्यास्ताच्या सुमारास मृत्युमुखी पडलेल्या भगवतिचरणांचा मृतदेह त्या निर्जन स्थळी तसाच पडून होता. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर साथीदारांनी अचेतन देह बहावलपूर रस्त्यावर या मंडळींचा मुक्काम असलेल्या बंगल्यावर नेला. पत्नी दुर्गादेवी यांचे सांत्वन कोणी व कसे करावे? मात्र तीचे वर्तन एखाद्या वीरपत्नीला साजेसेच होते. आपण फ़ोडलेला हंबरडा उपस्थित असलेया भूमिगतांचा काळ ठरू शकतो हे त्या परिस्थितीतही दुर्गादेवी विसरल्या नाहीत. त्यांनी स्वतःचा अक्षरशः दगड केला. आता अंत्यसंस्कार तरी कसे करणार? दहन संस्कारामुळे पोलिसांना संशय येणार. मग नाइलाजाने जवळच्या अरण्यात एक खड्डा खणून शोकाकूल साथिदारांनी अश्रू ढाळत आपल्या महान वीराला अखेरचा निरोप दिला. ज्यानी राष्ट्रासाठी घराचा होम केला त्याला अंत्यसंस्कारही लाभला नाही. पहाट उजाडाच्या आत सर्वजण लाहोर सोडून जाणे भागच होते. एच.एस.आर.ए. च्या सुप्रिम कमांडरला रडताना त्याच्या सैनिकांनी प्रथमच आणि अखेरचा पाहीला.
दुसऱ्या दिवशी बोट क्लबवरून भाड्याने नेलेली आदल्या दिवशीची होडी परत आली नाही तेव्हा नावाडी महम्मदने महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याना खबर दिली मग अधिकाऱ्यांनी नदीच्या पात्रात शोधाशोध करून ती नांव मिळवली, तिच्यात मिळालेले सामानही पोलिसांनी नेले. पुढे सुखदेवराज यांच्यावर अभियोग उभा राहीला तेव्हा पोलिसांनी महम्मदला साक्षीसाठी नेले होते.