गोळे साहेब, 'तरुण' या शब्दाने थोडा गोंधळ उडालेला दिसतोय ! सध्याची तरुण पिढी झपाट्याने मराठीपासून दुरावताना दिसतेय. म्हणून तरुणांना विशेष आवाहन. काही अपवाद वगळता मराठीच्या प्रश्नावर सध्या काम करणारी बहुसंख्य मंडळी जेष्ट, प्रौढ अथवा प्रौढत्वाकडे झुकलेली आहेत असा माझा अनुभव आहे (मीही त्यापैकीच एक आहे! ). म्हणून तरुणांना आवाहन. तुमचेही स्वागतच आहे.  तुम्ही करीत असलेले काम जाणून घेणे व तुमच्या संपर्कात राहाणे मराठी अभ्यास केंद्राला नक्कीच लाभदायक ठरेल. तुमच्याशी संपर्क कसा साधायचा ते कृपया कळवावे.