आकंठ ह्या शब्दाचा असा वापर क्वचितच पाहावयास मिळतो

खरे तर आकंठ जेवण, आकंठ प्राशन अशा स्वरूपात अनेक ठिकाणी मी हा शब्द वाचल्यासारखे वाटते. दुर्दैवाने आंतरजालावर असा वापर केलेले  दुवा क्र. १ हे एकच पान सापडले.

मोल्स्वर्थ शब्दकोशात दुवा क्र. २ ह्या पानावर 'आकंठमर्याद भोजन' असा वापर एका उदाहरणात केलेला आहे आणि त्याच पानावर इतरत्र आकंठ आणि आकंठमर्याद हे शब्द समानार्थी असल्याचे सुचवलेले आहे.