मना, छान लिहिले आहेस,आवडले. गजलेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, मी तर तो आपला प्रांत नाही म्हणून लिखाणच बंद केले आहे.
नीलहंसा व माधवदादा, रचना लांबच्या लांब हवी, प्रत्येकाने एक एक कडवे /शेर आवडले म्हटले तरी शिल्लक उरेल अशी! तुषारने लिहिलेली कुसुमाग्रजांची कविता होती ना तशी.
किंवा प्रवासीच्या आहेत काही रचना , सगळे काफ़िये आपणच वापरायचे प्रतिसादाकरता नवे शब्द शोधणे अवघड जाते मग.! त्याशिवाय दीर्घ कविता आहेतच की मनोगतावर. गमतीच भाग जाऊ दे , रचनेतील एकच गोष्ट सर्वाना आवडू शकते ना.तसे सांगायला काही हरकत नाही असे वाटते.
मना, असेच लिहीत रहा.
सोनाली