पूर्वीच्या ध्वनिमुद्रक यंत्रांवर एक गणक असे. ध्वनिफितीबरोबर आकडे फिरत. फीत नेमकी कुठल्या आकड्यावर आहे ते दिसत असे. त्यामुळे फितीतले कुठले गाणे कुठे सुरू होते ते आवरणावरच्या यादीत लिहून ठेवले की हव्या त्या गाण्यापर्यंत जलद गतीने जाणे सोपे जात असे.
हौशी मंडळींना नाटकाच्या पार्श्वसंगीतासाठी ह्या गणकाचा उपयोग अनन्यसाधारण होता. कोठल्या संवादाचे वेळी कुठल्या आकड्यापाशी फीत आलेली असायला हवी ते संहितेत लिहून ठेवले की इतर काहीही उपकरणे वापरल्याशिवाय फीत त्या संवादासाठी त्या आकड्यापर्यंत आणून ठेवता येत असे आणि संवादाचे वेळी बिनचूक चालू करता येत असे.
आधुनिक ध्वनिमुद्रकांमध्ये ही सोय दिसली नाही. सध्या हौशी मंडळी नाटकात पार्श्वसंगीत कसे वापरतात माहीत नाही.