गणकाबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. त्याचा उपयोग घरात पाहूनही मी ते विसरलो होतो. माझ्या वडिलांनी घरातील बहुतेक ध्वनिफितींच्या कवर वर ते आकडे लिहून ठेवले होते.  
आधुनिक ध्वनिमुद्रकांमध्ये ही सोय नव्हती हे ध्यानात आले. पण गेले १४/१५ वर्षे तर सीडीचा वापर वाढला आहे. त्यात तर मिनिट/सेकंदानुसार पाहिजे त्या जागेवर जाता येते, त्यामुळे नाटकात त्याचाच वापर होत असेल. म्हणूनही ध्वनीफितींच्या कमी वापराचा अंदाज घेऊन ते गणक टाकले नसतील असे वाटते.