आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
बॉबीचं (२००६)वर्णन हे मुख्य धारेतला प्रायोगिक चित्रपट असं सहजपणे करता येईल. प्रायोगिक अशासाठी, की त्याला सांकेतिक रचना नाही. म्हणण्यासारखं कथानक नाही. केवळ एका ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे. पण केवळ संदर्भ. कारण चित्रपटभर आपण ज्या घटना पाहतो, त्यांचा या घटनेशी किंवा त्यात दिसणा-या व्यक्तिरेखेशी काही संबंध नाही. किंबहूना या इतर घटनाक्रमाला सत्याचा काही आधार नाही. यातली पात्रं ही काल्पनिक आहेत. ही काल्पनिक पात्रं एका हॉटेलमध्ये दिवसभर घडणा-या घाडामोडी दाखवितात आणि ती आपापल्या स्वतंत्र कथासूत्रात बांधलेली आहेत. या प्रत्येक कथासूत्राची लांबी ...
पुढे वाचा. : बॉबीः ऐतिहासिक-अनैतिहासिक