प्रेमाची व्याख्या अजून कुणालाच नक्की करता आलेली नाही. अंतिम स्वरूपात 'स्वतःची स्वतःशी एकरूपता म्हणजे प्रेम', पण हे समजणं जरा अवघड आहे त्यामुळे सद्य परिस्थितीत तरी ही घालमेल आणि आकर्षण म्हणजेच प्रेम! अशी घालमेल आणि आकर्षण एखाद्याच व्यक्तीविषयी वाटणं म्हणजे त्या व्यक्तीशी केमिस्ट्री जुळणं आहे आणि तो फार दुर्लभ योग आहे.
ज्याला खरं उत्कटतेनं सारं आयुष्य जगायचं आहे त्यानी अश्याच व्यक्तीशी लग्न करावं कारण असं पुन्हापुन्हा होत नाही. मी स्वतः असाच जगलो आहे आणि अतिशय सुखात आहे. ती मुलगी शोधून काढणं, अतिशय प्रामाणिकपणे तिला आपल्या भावना सांगणं, तिच्या भावना जाणून घेणं आणि घरच्याना सांगून एंगेज होणं पूर्णपणे फायद्याचं असतं. लग्नापर्यंत दोघही या (समाजमान्य) रिलेशनशीप मधून विधायक स्फूर्ती मिळवू शकतात आणि धेय पूर्ण करून विवाहबद्ध होऊ शकतात. लग्न होईपर्यंत ही हूरहूर जगण्यात जी बेहद्द मजा आणते त्याला तोड नाही पण तुमचे हेतू प्रांजळ हवेत.
माझ्या मते नातं म्हणजे निखळ पारदर्शकता! मी अनेक जोडपी आगदी जवळून बघीतली आहेत, एकमेकांबद्दल आकर्षण मला तरी कुठे पहायला मिळालं नाही. इतर कुठले तरी उद्देश घेऊन लोक जगत रहातात (म्हणजे म्हातारपणची सोय करणं, मुलांची लग्नं, नातेवाईकांच्या परतपरत भेटीगाठी, अत्यंत निरर्थक सहलींच्या योजना आणि तत्सम पण एकमेकाच्या सहवासाची मजा सोडून इतर सगळं)
अश्या प्रकारचं आकर्षणच तुम्हाला वैवाहिक जीवनात एकत्रं जगण्याची मजा देतं. माझ्या लग्नाला तेवीस वर्ष झाली आहेत आणि माझं आकर्षण अजून तसच आहे! जर ही घालमेल आणि आकर्षण अजून वाटत असेल तर मी म्हणतो तसं करणं निश्चीत श्रेयस होईल.
संजय