मा. द्वारकानाथ,
<<५४ कोटीच्या लोकांवर अशी काय मोहीनी घातली गेली हे कळतच नाही.>>
हे विधान आभासी आहे. आज लोकांनी अव्हेरलेला पराभूत उमेदवार या देशाचा गृहमंत्री आहेच की. गांधीना त्या काळी तशी स्पर्धा नव्हती कारण मवाळ त्यांचे अंकित होते आणि जहाल राष्ट्रकारणात मरत असल्याने ते स्पर्धेत अजिबात नव्हते.
<कॉग्रेसमध्ये सुध्दा जहाळ नेते होते,>
म्हणजे नेत्यांना रुचेल तितपत जहालपणा त्यांच्या कलाकलाने करणारे का?
सावरकर सुध्दा क्रांतीकारक होते, पण सरसकट बॉम्ब, गोळ्या, याचा त्यांनी पुरस्कार केला नाही.
सावरकरांनी सतत सशस्त्र क्रांतिचाच पुरस्कार केला. भगतसिंहानी बॉम्ब सारख्या विध्वंसक हत्याराचा अत्यंत अहिंसात्मक वापर केला. गांधींनी त्याबद्दल त्याचे कौतुक का बरे केले नाही? का देशाला त्याची महती सांगितली नाही?
कारण भारतासारख्या खंडप्राय देशात हिंसाचाराचा मार्ग हा भस्मासुरासारखा राहील हा सुज्ञपणा आपल्या नेत्यामध्ये होता.
नेते म्हणजे गांधी,नेहेरू आणि त्यांचे अंकितच ना?
३. गांधीचे एक वैशिष्ठे मानले पाहिजे, अनेकवेळेस त्यांच्या विरोधात राष्ट्रीय नेते गेले, कार्यकारीणी गेली, विरोधात कॉग्रेसमधील गट-उपगट होते, संस्थानीक, ब्रिटिश शासन इत्यादी असतांनाही त्यांची राजकारणावरची पकड मात्र कधीही सैल पडली नाही.
याला झोंडशाही म्हणतात. हिटलरच्या सुवर्णकाळात त्याचीही नेमेकी हिच स्थिती होती.
१९३९ साली कॉन्ग्रेस्च्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली. दि. २९.०१.१९३९. नेताजी सुभाष विरुद्ध गांधींचा पीत्त्या पट्टभीसितारामया. निकाल???????? - नेताजी कसलाही प्रचार न करता १५८० आणि पट्टाभी यांच्यासाठी गांधींनी सर्वस्व पणाला लावुनही १३७५. बंगाल मध्ये ४०० विरुद्ध ७९ तर पंजाबात १८२ विरुद्ध ८६. कर्नाटक, केरळ, दिल्ली, आसाम व मद्रासमध्येसुदधा सुभाषच आघाडीवर. फ़क्त राजेंद्रप्रसादांचा बिहार, पट्टाभींचा आंध्र आणि गांधींचा गुजरात येथे पट्टाभींची सरशी तरीही पराभवच. हा प्रत्यक्ष गांधींचाच दारुण पराभव होता. आणि गांधी तो पचवू शकले नाहीत.