निकिता + निकिता येथे हे वाचायला मिळाले:
स्वाभिमान संघटनेने नुकताच मुंबईची पाणीटंचाई सोडवण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढला. मात्र या मोर्च्यामागील त्यांचा हेतू किती प्रामाणिक आहे याविषयी जरा प्रश्नचिन्हच आहे. कारण जर स्वाभिमानला लोकांच्या पाणी समस्येविषयी एवढी तळमळ असेल तर सिंधुदुर्गातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ते काय करत आहेत असा प्रश्न पडतो. त्यांच्या या आंदोलनाची बातमी वाचुन कोकणातील सर्वसामान्य माणसांना हा प्रश्न पडला नसेल तर नवलच.