पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा वापर किंवा उपयोग म्हटले तर स्वताच्या आनंदासाठी आणि पैसे मिळविण्यासाठीही करता येऊ शकतो. प्रसारमाध्यमात किंवा एखादा विषय घेऊन त्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अनेक छायाचित्रकार आहेत. वृत्तपत्रातील छायाचित्राबाबत असे म्हणतात की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे शब्दात सांगू शकणार नाही ते एखादे छायाचित्र सांगू शकते. छायाचित्र हे खूप बोलके असते. त्यामुळे छायाचित्र एखादे जळजळीत वास्तव किंवा सामाजिक प्रश्न जितक्या ताकदीने मांडू शकते तितक्याच ताकदीने व्यक्तीविषयक किंवा अन्य प्रसंग चपखलपणे टिपू ...