नव्या पिढीच्या हाती जी मराठी आपण सध्या दिलेली आहे, तिच्यात स्नातक वा स्नातकोत्तर अभ्यासक्रमही सर्व विज्ञानविषयांकरता मराठीतून उपलब्ध नाही. नवी पिढी जे शिकलेलीच नाही ते अनुसरणे शक्य नाही. सर्व स्तरावरचे सर्व विज्ञानविषयक अभ्यासक्रम मराठी माध्यमातून उपलब्ध व्हावेत अशी खरी गरज आहे. त्याअनुषंगाने सर्व संवेद्य विज्ञानविषयांवरील स्नातक व स्नातकोत्तर स्तरावरील पुस्तकांचे मराठीतून शिक्षण देता यावे अशा पुस्तकांची निर्मिती करणे हे प्रथम लक्ष ठेवायला हवे आहे. मी त्या दिशेने प्रयत्नशील आहे. माझा संपर्कपत्ता आपणास स्वतंत्ररीत्या कळवेन. आपण करत असलेल्या कामाशी संलग्न राहणे मलाही नक्कीच आवडेल.