एखाद्या नवीन शब्दात श किंवा ष यापैकी काय वापरायचे हे कसे ठरवावे?
नवीन शब्द संस्कृत असणार नाही, की फार्सी. तो मराठी-इंग्रजी-‌हिंदी वगैरे भाषेतलाच असणार, त्याअर्थी त्यामध्ये 'श'च वापरायचा, 'ष' वापरायचा प्रश्नच उद्भवत नाही.
'ष'चे योग्य उच्चार ऐकायचे असतील तर सुधीर फडके/गजानन वाटवे/हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली, दिग्दर्शित केलेली गाणी ऐका, आकाशवाणीवर निवेदकाचे बोलणे ऐका, दूरदर्शनच्या (फक्त) सह्याद्री वाहिनीवरच्या उद्‌घोषणा आणि बातम्या ऐका; 'ष'चे प्रमाण उच्चार ऐकायला मिळतील.
मराठीत दोन 'शं'ची गरज नाही, 'ष' हा फक्त विद्वानांनाच  उच्चारता येतो, असा प्रचार गेली २०-२५ वर्षे धूमधडाक्यात चालू आहे, त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करा, आणि 'ष' चा खणखणीत व सुस्पष्ट उच्चार करायची सवय लावून घ्या.  मराठी उच्चारांची ज्ञ आणि ष ही दोनच वैशिष्ट्ये आता शिल्लक राहिली आहेत.
. --अद्वैतुल्लाखान.