संजय यांचा उत्कट प्रतिसाद फार आवडला. अशा निखळ प्रेमाची कबुली देणारे आणि ते समजून जगणारे फार थोडे (विशेषतः पुरुष) आढळतात. बरेचदा बायको कडून बाकी कौटुंबिक जबाबदार्या पार पाडणे, मुलांचे संगोपन, घर सांभाळणे अशाच अपेक्षा असतात.... आणि स्त्रियांना नक्की काय हवे याचा उलगडाच या मंडळींना शेवटपर्यंत होत नाही... मला वाटते ही असोशी आणि उत्कटता असली तर इतर सगळे लहान मोठे अडथळे कुठलिही स्त्री लीलया पार पाडू शकते.