जगायला फक्त एकच क्षण उपलब्ध आहे तो म्हणजे हा क्षण आणि या क्षणात जगाण्याचे फक्त दोनच पर्याय आहेतः एक : विचार करून किंवा दोन : फिल घेऊन (किंवा काय वाटतयं तसं, अर्थात आकर्षणानी)

ओशोंचं एक फार सुरेख वाक्य आहेः  विचार फक्त एकच काम करू शकतो आणि ते म्हणजे दुसऱ्या विचाराला जन्म देणं !

त्यामुळे तुम्ही या क्षणात विचार केलात की तो क्षण पुढच्या क्षणासाठी विचार निर्माण करतो आणि ह्या सवयीनं हा क्षण (आणि पर्यायानी जगणं) हातातून निसटून जातं.

प्रिय व्यक्ती निवडायचा विचार कसा होऊ शकेल? तो फिलचं हवा! तुम्हाला ती का आवडली हे सांगता नाही आलं पाहिजे तर खरी मजा! कारण-मिमांसा करून केलेली निवड कधीही बेचव होऊ शकते, कारण कारणं बदलायला फारसा अवधी लागत नाही आणि मग आपण ज्या अटींवर निवड झाली होती ती आता सार्थक नाहीत, पर्यायानी निवड रद्द म्हणायला मोकळे होतो. फिलचं तसं होत नाही ती तुमची जवाबदारी होते, खरं तर ती तुमची चाहत होते त्यामुळे कारणं आणि परिस्थिती कितीही बदलली तरी तुमचं आकर्षण फिटत नाही.

अर्थात हे आकर्षण पहिल्या पासून हवं ते निर्माण करतं येत नाही, ते एकदम बेहिशोबी काम आहे पण आकर्षण वाटल्यावर त्या दिशेनी निघणं आगत्याचं असतं. सगळं जगणं असंच आहे.

असो, मी तरी असा जगतो, जमलं तर बघा!

संजय