या सविस्तर आणि सहजगम्य माहितीच्या प्रतिसादानंतर आता काही लिहायचे बाकी उरलेलेच नाही. तरी पण..
शुद्ध मराठींनी ष ची जोडाक्षरे ट-ठ-ण-य-क-प-म-व यांच्याशी होतात हे वर सांगितलेच होते. (उदाहरणे--शिष्ट, वरिष्ठ, उष्ण, आयुष्य, शुष्क, बाष्प, उष्मा आणि कुरुष्व). या उलट पाहिले तर क आणि र यांचे जोडाक्षर ष शी होते(उदा. वर्ष, राक्षस-राक्षस इत्यादी) .
सहा या आकड्याशी संबंध असेलेल्या अर्थाच्या शब्दाचे पहिले अक्षर ष असू शकते हेही वर येऊन गेले आहे. आता उरले आहेत ते ष हे शब्दातले दुसरे किंवा पुढचे अक्षर असलेले शब्द. हे देखील अनेक असावेत. विषय, आषाढ, भाषिक, भाषी, भाषेला, भाषैक, माषुक, शिरीष, मनीषा, वैशेषिक, ज्योतिषी, रामेषु, विशेषेण, वगैरे वगैरे.--अद्वैतुल्लाखान