प्रवासी,
तुम्ही झोपेचे वर्णन खूप छान केले आहे. खूप हसु आले. तुम्ही हसवणारे लेखन का करत नाही? मला पण झोप अत्यंत प्रिय आहे.
आमच्या लहानपणी आम्हाला (मला व बहिणीला) आई उठा ,उठा अशा हाका मारुन ती १ ते २ जपमाळा पूर्ण करायची. लग्नानंतर iitb hostel ला रहाताना सकाळी ८ चा गजर लावून झोपायचो. गजर झाला की तो बंद करुन परत झोपायचो. नवऱ्याला नोकरी लागल्यावर सकाळी चहा व जेवणाचा डबा करुन नवऱ्याला कामावर पिटाळले की परत झोप. मी जेंव्हा नोकरी करायचे तेंव्हा जास्तीत जास्त झोपून नंतर पटापट कामे आटपुन नोकरीला जायचे. असो.
रोहिणी