ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

काय करू अन काय नको असं झालंय. मन आनंदाने गिरक्या काय घेतंय, मधेच एखादी आठवण येऊन डोळे काय भरून येताहेत. काहितरी गमतीशीर आठवुन एकटीच हसतेय काय. काही विचारू नका.. का? मी जातेय माझ्या देशात. माझ्या भारतात. ओळखिच्या देशात, ओळखिच्या वातावरणात आणि ओळखिच्या भाषांत.

तेच ओळखिचे गंध, तेच ओळखिचे आवाज, तेच ओळखिचे आपुलकिचे स्पर्श सगळं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, अनुभवुन मनाच्या डबीत घट्ट बंद करून कधिही निसटू न देण्यासाठी.

आजीने बोटे मोडीत कडकडून काढलेली दृश्ट, बाबांचा डोक्यावरून फिरणारा हात, दादाने ओढलेले केस, आईने सुकली गं पोर ...
पुढे वाचा. : मन वढाय वढाय