आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
एखाद्या उद्योगाची वा समाजव्यवस्थेची पार्श्वभूमी घेऊन तिचा वापर कथा सांगण्यासाठी करायचा, हा फॉर्म्युला आपल्याकडे ताजा वाटणारा असला, तरी "अनहर्ड ऑफ' म्हणण्यासारखा नक्कीच नाही. आर्थर हेली या प्रसिद्ध लेखकाने जवळपास आपलं पूर्ण करिअर हे या प्रकारची पार्श्वभूमी वापरून त्यापुढे नाट्यपूर्ण कथानकं सांगणाऱ्या कादंबऱ्यांसाठी वापरलं. हॉटेल, मनीचेंजर्स, इव्हनिंग न्यूज, स्ट्रॉंग मेडिसीन यांसारखी त्याच्या कादंबऱ्यांची नावंदेखील त्या कोणत्या उद्योगाचा वापर पार्श्वभूमी म्हणून करतात, हे स्पष्ट करायला पुरेशी आहेत. विशिष्ट उद्योगाच्या अत्यंत किचकट तपशिलात ...