मी सहमत आहे ...
याला बिन मतल्याची गज़लही म्हणता येत नाही
पण 'मन' पुढे चांगली गज़ल लिहू शकतील असे वाटते
मनोगत वर पंचाईत अशी आहे की एखादा नियम सांगावा तर २ प्रकारे
प्रतिसाद मिळतो.
१) गज़ल आपला प्रांतच नाही असे म्हणून लोक गज़ल लेखन
    करण्याचे टाळतात.
२) तर दुसऱ्या बाजूला, काही दीड शहाणे  अक्कल शिकवणारे तुम्ही कोण ? गज़लेसाठी माझा हाच नियम आहे.  असे सांगून घरगुती गज़ल तयार करतात.
या दोन्ही वृत्ती म्हणजे दोन टोकांच्या गोष्टी असून गजलेस मारक आहेत. मन याची ही रचना गज़ल नसली तरी खूपच ठीक आहे.  दोन ओळीत एकाच प्रकारच्या कल्पना येत असल्या तरी निदान दोन ओळीत काही तरी संबंध आहे, एक 'थीम' आहे .

पण आजच एक रचना गज़ल म्हणून वाचली आणि गज़लेच्या नावाने असंबध्द बडबड कशी केली जाऊ शकते याचे एक उदाहरण मिळाले.

http://www.marathiworld.com/muktangan/shayari/shayari6.htm

- यादगार