देव या पदा विषयी जो विचार पक्का रुजलाय्, तो म्हणजे 'द'-दताती 'एव' - देवः. यज्ञ या संकल्पनेत त्याग ही मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणून जो फक्त देणे जाणतो, तो देव. अर्थात् देण्यासाठी ती वस्तू आपल्याकडे असावयास हवी तरच ती कुणाला देणे शक्य होईल. याच भावनेने वेदातील अनेक ऋचा वेगवेगळ्या देवतांकडे धनादीची मागणी करणाऱ्या दिसतात.
     दिव्य प्रकाश प्राप्त होण्यासाठी तप म्हणजेच कठोर साधना करावी लागते. याचा काहीसा अनुभव मला आला आहे. त्यातून मनाची धारणा बदलते. त्याचे विषय बदलतात. एक अनामिक ओढ, तहान मनास लागलेली राहाते. ती हवीहवीशी वाटत राहाते, हे विशेष! असो.
      आपले लिखाण आवडले. धन्यवाद.