यात वापरलेली भाषा मला खूप क्लिष्ट वाटली.
पुस्तिकेतल्या पहिल्याच पानावर वापरलेली बोलीभाषा पाहून या मंडळींना मराठीचे कितपत भले करायचे आहे अशी शंका येऊन गेली. परिपत्रकात, पुस्तिकेत, जाहीर निवेदनात आणि इतर सर्व प्रकारच्या वैचारिक लिखाणात केवळ प्रमाण मराठी वापरावी असा शुद्धलेखनाचा एक सामान्य नियम आहे. संवादांतले प्रत्यक्ष शब्द लिहिताना, लिखाणाला अस्सलपणा यावा म्हणून किंवा विनोदनिर्मितीसाठी बोलीभाषा चालते.
लिहिलेली भाषा प्रमाण स्वरूपात असली तरी वाचताना किंवा भाषण करताना बोलीभाषा आपोआपच उचारली जाते. त्यासाठी ती तशी लिहिण्याची आवश्यकता नसते. संपूर्णपणे स्लँग इंग्रजीत लिहिलेले किती ललित आणि वैचारिक/शास्त्रीय लेखन आपण वाचले आहे?--अद्वैतुल्लाखान