गणित आणि विज्ञान या विषयांची पुस्तके इंग्रजीतून असावीत आणि इंग्रजी तांत्रिक संज्ञांना कंसात मराठी पारिभाषिक शब्द दिलेले असावेत. पुस्तकाच्या शेवटी अन्य भारतीय व निवडक परदेशी भाषेतील समानार्थी शब्दांची एक शब्दसूची असावी. विषय समजावून सांगताना गरज पडल्यास इंग्रजीखेरीज अन्य भाषा वापराव्यात. महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे आणि त्यांना मराठीशिवाय अन्य भाषा समजत नाहीत असा पूर्वग्रह असू नये.  जगात कुठल्याही देशात मातृभाषेतूनच शिक्षण मिळते असे नाही.

महाराष्ट्रातून शिकून गेलेला विद्यार्थी जगात कुठेही आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्यास समर्थ असला पाहिजे.