(कदाचित लोक कधीही बोलावतात आणि व्यक्तिगत आयुष्य म्हणून काही राहत नाही, म्हणून गुरुजींनीच लढवलेली ही शक्कल असावी. )
कदाचित नव्हे नक्कीच तसें असणार. कारण अंत्यविधीसाठीं न यायला दुसरें कोणतेंही स्वीकारणीय असें संयुक्तिक कारण मिळणार नाहीं. अशा असत्यातूनच भूतप्रेत इ. अंधश्रद्धांचा जन्म होतो. समाजमनही अशा अतर्क्य गोष्टीवर विश्वास चटकन ठेवतें कारण बुद्धीला तोशीस पडत नाहीं. व वैज्ञानिक सत्यावर विश्वास ठेवत नाहीं. कारण त्यानें बुद्धीला शीण द्यावा लागतो.
दुसरी गोष्ट अशी कीं कांहीं मानसिक आभास हे अगदीं खरे वाटण्याएवढे सत्य आणि भिडणारे असतात. उदा. भानामती. या प्रकारांत घरांतल्या वस्तू सरळ खिडकीतून जमिनीवर फेंकून दिल्याप्रमाणें आदळतात. संशोधनाअंती त्यातील सत्य बाहेर आलें.
गेल्या शतकात एका जादुगारानें केवळ नजरेच्या सामर्थ्यानें खिळे वाकवून दाखवले होते. त्याविरुद्ध तिथल्या तत्कालीन अंधश्रद्धा निर्मूलन स्वयंसेवकांनीं खटला भरला. हा प्रयोग त्या जादुगारानें भर कोर्टांत शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत करून दाखवला. स्वयंसेवक तो खटला हायकोर्टांत हरले. नंतर हाच प्रयोग युरी गेलर नांवाच्या एका सामान्य जादुगारानें दाखवला. न्यायाधीशमहाशयांना तसेंच नामवंत शास्त्रज्ञांना न उलगडलेलें कोडें त्या सामान्य जादुगारानें सहज उलगडून दाखवले व त्यातली लबाडी दाखवून दिली. हे न्यायाधीश, नामवंत कीर्तीचे आंतराष्ट्रीय ख्याती असलेले शास्त्रज्ञ कांहीं मूर्ख नव्हतेच. पण फसलेच कीं. सांगायचा मुद्दा हा कीं उगाच अंधश्रद्धा ठेवूं नये. जरी आपण कितीही सतर्क असलों तरी चोरी होतेच, तस्सेंच अशा गूढ घटनांत असतें. आपल्याला तें गूढ उलगडत नाहीं एवढेंच.
सुधीर कांदळकर