॥ उगाच उवाच ॥ येथे हे वाचायला मिळाले:

नाशिकला (आणि आणखी ब-याच गावांमध्येही असेल) बुधवारचा बाजार भरतो. जुन्या नाशकात, गोदेकाठी सकाळी सकाळी ताजी भाजी विकायला येते. जुने जाणकार (कापडी!)पिशव्या घेऊन आपापल्या ठरलेल्या विक्रेत्याकडून भाजी घेतात. मग तिथल्या तिथेच थोडीशी घासाघीस आणि बराचसा हसी-मजाक होतो.
लहानपणी बाबांबरोबर जायचो बाजारात तेव्हाच्या "भाSSSऊ.. अरे तोंडली गोड हायती. सस्ती लावली" अशा हाका अजून कानात आहेत. मग अर्धा किलो (तेव्हा अर्धा शेर म्हणायचे बहुतेक) घेताना ती भाजीवाली १००-२०० ग्रॅम अगदी सहजच जास्ती घालायची. शिवाय सकाळची पहिली ’भवानी’ असल्यामुळे ...
पुढे वाचा. : काळा बाजार