अशी परस्पर विरोधी विधाने प्रत्येकच जण कधी ना कधी करीत असतो. त्या त्या वेळची परिस्थिती, विचार आणि तीवरचे ते भाष्य असते. म्हणून तेच धरून चालणे योग्य आहे का? संदर्भ, काल लक्षात घ्यावयास हवे.
भूमिका पटली नाही तर नटाने ती करू नये. त्यामागील विचार पटल्यासच भूमिका करावी. " हे योग्यच नाही का? जर एखाद्या भूमिकेमागची तार्किकताच पटत नसेल तर नट तीत जीव तरी कसा ओतणार? आणि ती साकार कशी करणार?
तसेच त्यांचे वरचेही विधान! नटाने एखादी भूमिका केली म्हणजे त्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला असे होत नाही.
हे तर केवळ नाटक असते. प्रत्यक्षातली मते भिन्न असू शकतात. चांगलीही आणि वाईटही!