ब्राउझर-कंपॅटिबिलीटी बघावी लागेल का? कारण माझ्याकडे मराठी अक्षरांच्या जागी चौकोन-चौकोन दिसत आहेत.

आता कोठल्याही (यूट्यूबच्या) ध्वनिचित्रदर्शनाखाली (उपलब्ध असल्यास) उपशीर्षके दाखवण्याची सुविधा मनोगतावर केलेली आहे. (यूट्यूबवर असलेली उपशीर्षके न दाखवता) ही उपशीर्षके मनोगतावरील फायलीद्वारे वाचली जातील आणि मनोगतावरच्या अक्षरवळणामध्ये दिसतील. असे केल्याने ही चौकोन चौकोन दिसण्याची समस्या दूर झालेली असेल असे वाटते.

सध्या ही सुविधा अनेक तडजोडी करून सुरू केलेली आहे. सफाई आणि सोयीस्करपणा ह्याबाबतीत सुधारणेस अद्याप पुष्कळ वाव आहे. अधिक चाचण्या चालू आहेत.