स्कूटरी हा शब्दप्रयोग अतिशय आवडला.
एकेकाळी स्कूटरला प्रदीर्घ काळ प्रतीक्षा यादी असे आणि आपला 'नंबर' आला ही अतिशय आनंदाची (आणि मानाची? ) गोष्ट असे असे वाटते. (मला कल्पना नाही कारण आम्ही स्कूटर घेतली (आणि विकलीही) तेव्हा मोकळेपणे स्कूटरी मिळायला लागल्या होत्या!) आम्ही उत्तीर्ण होईपर्यंत सर्व प्राध्यापकवर्गाकडेही स्कूटरी नव्हत्या. (असे आठवते. )
बजाजची 'चेतक' भारतात मिळत नसे. (बहुधा परकीय चलनावरच मिळत असे. चू. भू. द्या. घ्या. ) तेव्हा जर कुणाकडे चेतक दिसली तर तो चर्चेचा विषय होत असे. पुढे सुपर हे चेतकसारखेच दिसणारे (पण छोट्या चाकांचे) मॉडेल आले.
मी खरे तर बजाज स्कूटरचा चाहता नाही. तिच्यावर बसून पार्श्वभाग ठणकायला लागत असे आणि चालवताना हँडलच्या थरथराटाने नंतर तळहात लाललाल होत असत. असे असूनही जेव्हा मी सिंगापुरात कोणी बजाज चेतक स्कूटर वापरलेली पाहिली तेव्हा मला अभिमान वाटला होता हे खरेच.